2023 च्या एसएसएलसी परीक्षेत जी. जी. चिटणीस इंग्लिश मीडियम हायस्कूलचा 100% निकाल लागला आहे. 100% निकाल मिळवणारी ही बेळगाव शहरातील एकमेव इंग्लीश मीडियम हायस्कूल ठरली आहे.

एसएसएलसी परीक्षेला बसलेल्या 52 विद्यार्थ्यांपैकी 19 जणांनी डिस्टिंक्शन्स मिळवले आहेत. गुणवत्तापूर्ण निकालासाठी शिक्षण विभागाने शाळेला ‘अ’ श्रेणी दिली आहे.
गुरुप्रसाद अंकलगी 98.88% मिळवून शाळेत प्रथम, प्रज्ञा भक्तीकर 98.08% मिळवून द्वितीय तर रुतिका मालगेर 97.44% मिळवून शाळेत तृतीय आली.
प्रज्ञा भक्तीकर हिने इंग्रजीत 125/125, समाज शास्त्रात 100/100 गुण मिळवले आहेत. गुरुप्रसाद अंकलगी यांनी कन्नड, गणित आणि विज्ञान या विषयात 100/100 तर समृद्धी केसरकर हिला हिंदीत 100/100 गुण मिळाले आहेत.
शाळेचे अध्यक्ष ऍड. चंद्रहास जी. अणवेकर व विश्वस्तांनी या विद्यार्थ्यांचे व प्राचार्य डॉ. नविना शेट्टीगार व शिक्षक वर्गाचे या उत्कृष्ट कामगिरीबद्दल अभिनंदन केले आहे.
Recent Comments