हुक्केरी आणि यमकनमर्डी विधानसभा मतदारसंघात १० मे रोजी होणाऱ्या मतदानासाठी सर्व तयारी पूर्ण करण्यात आली आहे, असे निवडणूक अधिकारी डॉ. विजयकुमार अळुरे आणि बाळाराम चव्हाण यांनी सांगितले.

व्हॉईस ओव्हर : प्रसारमाध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, 9 तारखेला निवडणूक कर्मचारी तालुक्यातील नियोजित मतदान केंद्रावर जाऊन तयारी करतील. उमेदवार 10 तारखेला सकाळी येऊन केंद्रातील व्हीव्ही पॅट मशिन तपासू शकतात. सकाळी सात वाजता मतदानाला सुरुवात होणार असून त्याच दिवशी हुक्केरी येथून पोलिस बंदोबस्तात ईव्हीएम मशिन्स बेळगावला रवाना करण्यात येणार असून, नागरिकांनी मतदान करावे, असे त्यांनी सांगितले.
बलराम चव्हाण म्हणाले की, सोमवारी जाहीर प्रचार संपणार असून मंगळवारी घरोघरी जाऊन प्रचार करता येईल, मतदान केंद्रावरील नियम आधीच उमेदवार व त्यांच्या एजंटांना कळविण्यात आले असून त्यांनी त्यानुसार सहकार्य करावे
यावेळी तहसीलदार संजय इंगळे, उपतहसीलदार श्रीशैल मगदुम्म, एम.एम.बलदार उपस्थित होते.


Recent Comments