DEVELOPMENT WORK

पंजाबच्या सुवर्ण मंदिराजवळ पुन्हा एक भीषण स्फोट, 24 तासांत दोन वेळा स्फोट

Share

पंजाबमधील अमृतसरमध्ये सलग दुसऱ्या दिवशी स्फोट झाला आहे. सुवर्ण मंदिराजवळ सकाळच्या सुमारास स्फोट झाला. हा स्फोट बॉम्बमुळे झाला की अन्य कशामुळे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पण सर्वात मोठी बाब म्हणजे हा स्फोट सलग दुसऱ्या दिवशी झाला आणि सुवर्ण मंदिराजवळच झाला आहे.

अमृतसरमध्ये सलग दुसऱ्या दिवशी स्फोट झाला आहे. सुवर्ण मंदिराजवळ सकाळच्या सुमारास स्फोट झाला. हा स्फोट बॉम्बमुळे झाला की अन्य कशामुळे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पण सर्वात मोठी बाब म्हणजे हा स्फोट सलग दुसऱ्या दिवशी झाला आणि सुवर्ण मंदिराजवळच झाला आहे.
सुवर्ण मंदिराजवळील हेरिटेज स्ट्रीटवर शनिवारी मध्यरात्री झालेल्या स्फोटात सहा जण जखमी झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र, हा दहशतवादी हल्ला नसून केवळ अपघात असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. तरीही, आसपासच्या परिसरात कोणतीही संशयास्पद वस्तू लपवून ठेवल्याच्या भीतीने परिसराची झडती घेण्यात येत असल्याचे सूत्रांनी सांगितले. शोधमोहिमेसाठी पोलिसांनी रस्त्याची एक बाजूही बंद केली आहे.

अमृसरमधील स्फोटामुळे जवळपासच्या इमारतींच्या खिडक्यांच्या काचा उडाल्या. अमृतसरचे पोलीस आयुक्त नौनिहाल सिंग यांनी ट्विट केले की, “घटनेतील तथ्ये तपासली जात आहेत आणि घाबरून जाण्याची गरज नाही.” त्याच प्रमाणे, नागरिकांना शांतता आणि सलोखा राखण्याचे आवाहन करण्यात आले आहे. कोणतीही पोस्ट किंवा व्हिडिओ शेअर करण्यापूर्वी वस्तुस्थिती तपासण्याचे आवाहनही पोलिसांनी नागरिकांना केले आहे.

Tags: