शैक्षणिक वर्ष 2022-23व्या वर्षाच्या दहावीच्या परीक्षेला , बेळगावच्या मूकबधिर शाळेचे एकूण 21 विद्यार्थी बसले होते, त्यापैकी 12 विद्यार्थ्यांनी A ग्रेड तर 9 विद्यार्थ्यांनी B+ ग्रेड मिळवली . आणि शाळेचा 100 टक्के निकाल लागला आहे .
अर्पिता धरगोंडा कुंभार हिचा 83.53 गुण मिळवून प्रथम क्रमांक आणि संगिता धरेन्नावर हिने 81.65 गुण मिळवून द्वितीय क्रमांक पटकावला .
पौर्णिमा आनंद सुनकुंपी हिने ८०% गुण मिळवून तिसरा क्रमांक पटकावला. मुलांच्या या कामगिरीबद्दल बेळगावच्या महिला व बालकल्याण विभागाचे उपसंचालक बसवराज, आणि जिल्हा दिव्यांग कल्याण अधिकारी, नामदेव बिलकर, मूकबधिर मुलांच्या शासकीय शाळेचे अधीक्षक. , मंदाकिनी वंदकर, शिक्षिका, एस.बी. पाटील, रत्नम्मा.पी, पद्मश्री सी, गायत्री कडबूर आणि इतर शिक्षक व कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले .
Recent Comments