काँग्रेस सत्तेत येईलच याची त्यांना शाश्वती नाही. त्यामुळेचह गॅरंटी कार्ड सारखी खोटी आश्वासने देऊन लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न काँग्रेस करत आहे असा आरोप भाजपचे प्रदेश प्रवक्ते एम. बी. जिरली यांनी केला.
बेळगाव भाजप कार्यालयात आज पत्रकार परिषदेत बोलताना भाजपचे प्रदेश प्रवक्ते एम. बी. जिरली यांनी सांगितले की, मोदींनी राज्यात काढलेल्या रोड शोला जनतेचा अभूतपूर्व पाठिंबा मिळाला आहे. जनतेचे हे प्रेम आणि विश्वास पाहिल्यास यावेळी कर्नाटकात बहुमताने कमळ फुलणार आहे हे निश्चित.
जिरली पुढे म्हणाले की, काँग्रेस खोट्या बातम्या पसरवून लोकांची दिशाभूल करत आहे. वॉरंटी नसलेला काँग्रेस गॅरंटी काय देणार ? देशातील जनता सजग आहे आणि खरे काय आणि खोटे काय हे जनतेने आधीच ठरवले आहे. केंद्रात पंतप्रधान मोदी आणि राज्यात बसवराज बोम्मई यांचे सरकार असेल तर विकास शक्य आहे. डबल इंजिनचे सरकार पुन्हा सत्तेवर येईल, असे ते म्हणाले.
काँग्रेस कॉमनवेल्थ गेम्स, पीएसआय भरती घोटाळा आणि इतर 28 भ्रष्टाचारांच्या प्रकरणांमध्ये काँग्रेस सामील आहे. कर्नाटकात भाजपने लोकायुक्त मजबूत केले त्यामुळे आज भ्रष्टाचाराला आळा बसल्याचे ते म्हणाले. लिंगायत वक्तव्याबाबत बोलताना कोणीतरी खोट्या बातम्या पसरवून जनतेची दिशाभूल करत आहे. लिंगायत हे सुजाण नागरिक असून, त्यांना कोणत्याही शब्दात फसवले जाणार नाही व ते भाजपसोबतच राहतील असा दावा जिरली यांनी केला.
पत्रकार परिषदेला बेळगाव जिल्हा भाजपचे माध्यम प्रवक्ते सिद्धनगौडा पाटील, संयोजक शरद पाटील यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.


Recent Comments