उगारमध्ये मतदान करण्याविषयी मतदारांमध्ये जनजागृती करण्याचा कार्यक्रम घेण्यात आला.


कागवाडा विधानसभा मतदारसंघांतर्गत 231 मतदान केंद्रांपैकी उगार खुर्द शहरातील 194 आणि 195 मतदान केंद्रांवर गेल्या वेळी केवळ 62% मतदान झाले होते. त्यामुळे उगार नगरपालिकेच्या अधिकारी, आशा- अंगणवाडी सेविकांनी मतदारांमध्ये मतदान करण्यासाठी जनजागृती कार्यक्रम राबविला.
मतदान जनजागृती मोहिमेचे अधिकारी सुनील बबलादी व गोपाल माळी यांच्या नेतृत्वाखाली रविवारी सकाळी उगारखुर्दच्या प्रभाग क्रमांक 195 मध्ये मतदान जनजागृती करण्यात आली.
यावेळी बोलताना मतदार जागृती मोहिमेचे अधिकारी गोपाल माळी म्हणाले की, गेल्या निवडणुकीत मतदान केंद्र क्रमांक 194 आणि 195 मध्ये 62% इतके कमी मतदान झाले होते. अंगणवाडी व आशा सेविकांच्या उपस्थितीत येथील मतदारांमध्ये जनजागृती करून अधिकाधिक मतदान करावे, यासाठी जनजागृती करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
गेल्या निवडणुकीत या केंद्रावर सर्वात कमी मतदान झाल्याचे उगार नगरपालिकेचे अधिकारी सुनील बबलादी यांनी सांगितले. येथे मतदानाचे प्रमाण वाढावे यासाठी सर्व कर्मचार्यांसह मानवी साखळी तयार करून जनजागृती केल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी बीएलओ बी. आर. जाधव, डी. आर. वड्डर, एच. एफ. सन्नक्की, संतोष डोंबारे, ग्राम लेखापाल एम. एम. कनकनवर, हनुमंत हडपद, राजश्री न्यामगौडर, सुजाता मुळीक आदी या मोहिमेत सहभागी झाले होते.


Recent Comments