Belagavi

१० मे रोजी होणाऱ्या निवडणुकीमध्ये काँग्रेसला करा मतदान

Share

कर्नाटक लिंगायत आणि वीरशैव विचार वेदिकेच्या वतीने , आगामी १० मे रोजी होणाऱ्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीमध्ये , सर्व लिंगायतांनी , काँग्रेसला मतदान करण्याचे एक पत्रक प्रसिद्ध केले आहे .


कर्नाटकाच्या राजकारणात लिंगायत नेतृत्वाला डावलण्यात येत आहे . सर्वत्र लिंगायतांचा विश्वासघात करण्याचा प्रयत्न राष्ट्रीय पातळी वरून करण्याचा प्रयत्न केला जात आहे .

एस . निजलिंगप्पा, बी डी जत्ती ,वीरेंद्र पाटील , वीरेंद्र पाटील ,राजशेखर मूर्ती , एस आर पाटील याना काँग्रेसने स्थानमान दिले आहे . प्रादेशिक आणि राष्ट्रीय स्तरावर महत्वाची पदे देऊन , काँग्रेस पक्षाने लिंगायतांचा आदर केला होता . मात्र भाजप लिंगायतांकडे वोट बँक म्हणून पाहत आहे . त्यामुळे लिंगायत आणि वीरशैव समाजाच्या बांधवानी जागे होऊन , भाजपाचा पराभव करावा आणि काँगेस पक्षाला निवडून देऊन सत्ता आणावी असे या पत्रकाद्वारे प्रसिद्ध करण्यात आले आहे .

Tags: