election

राजू कागे याना मतदान करण्याचे आवाहन

Share

2014 मध्ये तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी काँग्रेस पक्षाचे युवा नेते राहुल गांधी यांच्या शिफारशीवरून जैन समाजाचा अल्पसंख्याक यादीत समावेश केला आहे. असे माजी केंद्रीय पंचायत राज मंत्री जितेंद्र जैन म्हणाले.

माजी केंद्रीय मंत्री जितेंद्र जैन यांनी कागवाड तालुक्यातील शिरगुप्पी , कागवाड, शेडबाळ , उगार, ऐनापूर या गावांना भेट देऊन तेथील जैन समाजाच्या नेत्यांची भेट घेऊन त्यांना काँग्रेसचे उमेदवार राजू कागे यांना मतदान करण्याचे आवाहन केले .
ते म्हणाले काँग्रेस पक्षाला हस्त चिन्ह देणारे शेडबाळ गावचे सुपुत्र आणि राष्ट्रीय नेते विद्यानंद मुनी महाराज याना गांधी घराणे हे विसरलेले नाही.जैन मुनींनी काँग्रेस पक्षाला मोठी देणगी दिली आहे.

 

अथणी तालुक्याचे सेवानिवृत्त पाटबंधारे विभागाचे अभियंता अरुण यलगुद्री आणि अंकली गावचे डॉ. एन.ए. मगदूम यांनी यावेळी माहिती दिली .

शेडबाळ येथे झालेल्या कार्यक्रमात पीकेपीएसचे अध्यक्ष विनोद बारगळे, भारत नांद्रे, कुमार पाटील, न्यामगोंडा गेनाप्पगोळ, अण्णासाहेब आरवडे, चेतन नांदरे, गुंडा बागी, कांदे सर, नजीर मुल्ला, बाबासाहेब हुनकांबळे, विजय कांबळे, आदींसह अनेकांनी सहभाग घेतला.

Tags: