केपीसीसीचे कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी यांनी बेळगाव उत्तर मतदारसंघाचे काँग्रेस उमेदवार आसिफ उर्फ राजू सेठ यांच्या वतीने कणबर्गी परिसरात जोरदार प्रचार मोहीम राबवून विक्रमी मतांनी विजयी करण्याचे आवाहन केले.

राजू सेठ यांच्या प्रचार मोहिमेला दिवसेंदिवस चांगला प्रतिसाद मिळत आहे. शनिवारी सायंकाळी त्यांनी कणबर्गी येथे जोरदार प्रचार केला. प्रचारात सहभागी होऊन बोलतांना सतीश जारकीहोळी म्हणाले की, आसिफ उर्फ राजू सेठ हे चांगले उमेदवार आहेत, त्यांचे बंधू फिरोज सेठ यांनी त्यांच्या आमदारकीच्या कार्यकाळात अनेक विकास कामे केली आहेत जी आजही लोकांच्या स्मरणात आहेत. आम्ही मंत्री असताना शहरात चांगले प्रकल्प आणले. मात्र सध्याच्या भाजप आमदाराने स्मार्ट सिटीच्या नावाखाली निकृष्ट रस्ते केले आहेत. त्याच्या कृतीचा जनतेने विचार करावा. संपूर्ण राज्यात काँग्रेसला चांगला पाठिंबा मिळत आहे. त्यामुळे तुम्ही सर्वांनी आमच्या उमेदवारांना मोठ्या संख्येने मतदान केंद्रावर जाऊन काँग्रेसचे उमेदवार राजू सेठ यांना मतदान करण्याची विनंती केली.
नंतर राजू सेठ म्हणाले की, काँग्रेसने मला काँग्रेस बेळगाव उत्तर मतदारसंघाचा उमेदवार म्हणून उमेदवारी दिली असून, विजयी झाल्यानंतर प्रामाणिकपणे काम करून जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करेन. सतीश जारकीहोळी यांच्या नेतृत्वाखाली मी काम करणार असून, माझ्या भावाची विकासाची उद्दिष्टे होती त्याप्रमाणे मी काम करेन, असे ते म्हणाले.
यावेळी माजी नगरसेवक बैरगौडा पाटील, माजी महापौर यल्लाप्पा कुरबर, शकील अत्तार व इतर अनेक. कार्यकर्त्यांचा प्रचारात सहभाग होता.


Recent Comments