काँग्रेसवरचा जनतेचा विश्वास उडाला आहे.येत्या निवडणुकीत भाजप स्पष्ट बहुमताने सत्तेवर येईल. असे भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस अरुण सिंह म्हणाले.

शहरात पत्रकार परिषदेला संबोधित करताना ते म्हणाले कि , भाजप बीपीएल रेशन कार्ड धारकांसाठी दररोज अर्धा लिटर नंदिनी दूध आणि गणेश चतुर्थी, दिवाळी, गुढीपाडवा या सणांना दरवर्षी तीन सिलिंडर मोफत देणार असल्याचे ते म्हणाले.
पंतप्रधान मोदींच्या बेंगळुरू येथील रोड शोला प्रचंड गर्दी होती .
यायला भाजप बहुमताने विजयी होईल . .समुदायाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करणार असल्याचे ते म्हणाले.मणिपूर, गोवा, उत्तर प्रदेश, उत्तराखंड येथे काँग्रेसने दिलेले आश्वासन अद्याप पूर्ण झालेले नाही. मात्र भाजपने म्हटल्याप्रमाणे त्यांचे सर्व मनसुबे फसले असून यावेळी भाजप जाहीरनाम्यात दिलेली आश्वासने पूर्ण करेल.सिद्धरामय्या यांच्या कार्यकाळात बीबीएमपी रस्ते बांधकाम घोटाळा , शिक्षक भरतीआणि अन्य घोटाळे पाहून कर्नाटकातील जनता घाबरली आहे. केम्पेगौडा यांचा पुतळा , , बसवण्णा यांच्या अनुभव मंटपाच्या बांधकामामुळे कर्नाटकच्या संस्कृतीचा आदर अधोरेखित झाला आहे. कर्नाटकातील व्यापारी., व्यवसायांच्या विकासासाठी कोण कारणीभूत आहे हे लोकांना माहीत आहे.
काँग्रेसने आत्मविश्वास गमावला आहे, यावेळी जनता भाजपलाच साथ देईल. कर्नाटकात पुन्हा डबल इंजिन सरकार येणार असे ते म्हणाले.
माजी आमदार अनिल बेनके, खासदार मंगला अंगडी, महाराष्ट्राचे शिक्षणमंत्री गिरीश महाजन, भाजपचे माध्यम समन्वयक शरद पाटील उपस्थित होते


Recent Comments