Belagavi

दक्षिणमध्ये शक्ती प्रदर्शनाने अमित शाह यांचा भव्य रोड शो

Share

बेळगाव दक्षिण मतदार संघात भाजप उमेदवार अभय पाटील यांच्याकरिता केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी भव्य रोड शो केला. शेकडो कार्यकर्त्यांनी प्रचंड जल्लोषात या रोड शोमध्ये भाग घेतला.


बेळगाव दक्षिण मतदार संघात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या सहभागाने अभय पाटील यांच्यासाठी भाजपने रोड शोचे रविवारी सकाळी आयोजन केले होते. अभय पाटील यांचा बालेकिल्ला असलेल्या शहापूर भागातच प्रामुख्याने हा रोड शो करण्यात आला. वडगाव दत्तमंदिर ते नाथ पै सर्कल शहापूर खडेबाजार एसपीएम रोड परिसरात बाईक रॅलीत हजारोंच्या संख्येने जनसमुदाय दिसून आला. भाजपच्या खुल्या प्रचार वाहनात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि आ. अभय पाटील उभे राहून मतदारांना अभिवादन करत होते. यावेळी रोड शो जाईल त्या भागात मतदार, लोक त्यांच्यावर पुष्पवृष्टी करत होते. फ्लो

कार्यकर्त्यांना संबोधित करताना भाजपचे चाणक्य अमित शहा यांनी मतदारांना भाजपला साथ देण्याचे आवाहन केले. बेळगाव दक्षिण मतदारसंघातील भाजपचे उमेदवार अभय पाटील यांना 1 लाख मतांच्या फरकाने विजयी करा, कमळच्या अस्मितेला मतदान करून त्यांना पुन्हा एकदा विकासाची संधी द्या असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी बोलताना उमेदवार अभय पाटील म्हणाले की, 10 तारखेला भाजपला मतदान करून नरेंद्र मोदींच्या कृती आराखड्यातील बेळगाव मतदारसंघाचा विकास तुम्ही सर्वांनी पहा.
गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी 10 तारखेला अभय पाटील यांना मतदान करून एक लाखाच्या फरकाने विजयी करा, असे सांगितले. कर्नाटकला पुन्हा एकदा डबल इंजिन सरकारची गरज आहे, कमळ फुलवून पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली काम करा. यावेळी काँग्रेसमुक्त कर्नाटक करू, असेही ते म्हणाले.

या रोड शोमध्ये मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी दुचाकीवरून भाग घेतला. भाजपच्या खुल्या प्रचार वाहनासमोर बाईकस्वार कार्यकर्त्यांचा ताफा सामील झाला होता. त्याशिवाय पायी जाणारे कार्यकर्तेही मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. रोड शोमध्ये भाजपच्या महिला कार्यकर्त्यांची संख्याही लक्षणीय होती. फ्लो

जय शिवाजी, कित्तूर राणी चन्नम्मा की जय, अभय पाटील आप आगे बढो, हम तुम्हारे साथ है अशा जोरदार घोषणा यावेळी देण्यात आल्या. शहापूर खडेबाजार, महात्मा फुले रोड आदी प्रमुख मार्गांवरून हा रोड शो करण्यात आला. नेत्यांना पाहण्यासाठी लोकांनी घरांच्या गच्चीवर, छतावर मोठी गर्दी केली होती. अनेक ठिकाणी रोड शोवर फुले उधळून स्वागत करण्यात आले.

Tags: