Belagavi

विकासाच्या आधारावर यावेळी जनता करेल दुप्पट मताधिक्याने विजयी : आ . अभय पाटील यांचा दृढ विश्वास

Share

बेळगाव दक्षिण मतदार संघात विकासाचे नवे पर्व सुरु करून 95% सर्वांगीण विकास साधला आहे. पुढील काळात युवक आणि महिलांसाठी रोजगार निर्मिती, आरोग्य व शिक्षण क्षेत्राचा विकास करण्याचा मानस आहे. त्यामुळे येत्या 10 मे रोजी मतदारांना कमळ चिन्हापुढील बटन दाबून भाजपला मतदान करून मला आपली सेवा करण्याची पुन्हा एकदा संधी द्यावी असे आवाहन भाजपचे उमेदवार आ. अभय पाटील यांनी केले.

इन न्यूजला दिलेल्या खास मुलाखतीत बोलताना आ. अभय पाटील म्हणाले की, मला मिळणार प्रतिसाद पाहून विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. म्हणूनच अर्वाच्य शिवीगाळ, अपप्रचार करून ते माझ्याविरोधात गरळ ओकत आहेत. यातून ते आपली लायकी दाखवून देत आहेत. 10 मे रोजी जनताच त्यांना याचे उत्तर देईल.

बेळगाव दक्षिणमध्ये गोरगरिबांच्या मदतीसाठी 100 अथवा अन्य दर्शनी मूल्यांच्या बॉण्ड पेपरवर जागा खरेदी करून बांधलेली अनधिकृत घरे अधिकृत करण्याची प्रक्रिया एक-दीड वर्षांपूर्वीच सुरु केली आहे. त्यासाठी महानगरपालिका आणि संबंधित खात्याला प्रस्ताव पाठवलेला आहे. अशी घरे नियमित करून संबंधितांना हक्कपत्रेही देण्यात आली आहेत. अशाप्रकारची उर्वरित सर्व घरेसुद्धा नियमित करून देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.

दक्षिणमध्ये शिवचरित्र (शिवसृष्टी) उभारल्याच्या प्रकल्पाबाबत बोलताना आ. अभय पाटील म्हणाले की, नव्या पिढीला छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या महापुरुषांची ओळख करून द्यावी, त्यांनी त्यांच्यापासून स्फूर्ती घ्यावी या हेतूने शिवचरित्र प्रकल्प उभारला आहे. आदर्श राजा कसा असावा , तसेच अशा महापुरुषांचा इतिहास पुढील पिढीला समजावा हा यामागचा हेतू आहे .

टेक्स्टाईल्स पार्क , आयटी पार्क संदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले कि , मागील दहा वर्षांपासून आम्ही यासाठी प्रयत्न करीत आहोत , यावेळी हे प्रकल्प कार्यान्वित होतील . यासंदर्भात मुख्यमंत्री , पंतप्रधान मोदी यांची भेट घेतली आहे . या भागातील तरुणांना , रोजगाराची संधी याद्वारे उपलब्ध करून देण्यात येणार आहे .

येळ्ळूरमध्ये ४० एकर जागेत सुसज्ज असे स्टेडियम बांधण्यात येणार आहे . तुमची जागा आणि घरे यामध्ये जाणार अशी विरोधकांकडून जनतेमध्ये अफवा पसरवण्यात येत आहे . पण हे स्टेडियम सरकारी जागेवर बांधण्यात येणार आहे . यामध्ये कोणाचेही कसलेही नुकसान होणारं नाही .
तुमच्या मतदार संघाचा सर्वांगीण विकास करून देखील विरोधक तुमच्याबद्दल अपप्रचार , अर्वाच्य शिवीगाळ करीत आहेत या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले कि लोकशाहीत सर्वाना आपले मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे . माझी विकास कामे जनतेने पाहिली आहेत . जनता सुज्ञ आहे . ते अशा लोकांना निवडून आणणार कि , विकास कामे करणाऱ्याला निवडून आणणार हे ठरवेल .

मतदारसंघातील विणकर तुम्हाला कितपत साथ देतील या विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले कि , विणकरांची सरकारी पातळीवर सोयीसुविधा मिळवून दिल्या आहेत . विणकर सन्मान योजना लागू केली आहे . त्याचप्रमाणे विणकरांचे उत्पादन प्रत्येक शासकीय विभागाने २५ % खरेदी करणायचा ऐतिहासिक आदेश लागू करण्यात आला आहे . त्यामुळे , विणकर बांधव मला नक्की पाठिंबा देतील असा विश्वास असल्याचे ते म्हणाले .

बेगावच्या विकासासंदर्भात तुमच्या पुढील काय योजना आहेत या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले कि ,बेळगावात उद्योग येऊ शकतात ,त्या दृष्टीने वातावरण निर्मितीची गरज आहे . पुढील काळात आम्ही ते करू . उद्योग मंत्र्यांनी बेळगावात विशेष उद्योग योजना राबवू असे सांगितले आहे .
आरोग्याच्या दृष्टीने , सरकारी रुग्णालयाचा विकास तसेच अत्याधुनिक उपचारांची सुविधा देण्यात येईल तसेच खिदवाइ हॉस्पटिल निवारण करण्याचा प्रस्ताव बजेटमध्ये मंजूर करण्यात आला आहे .

एकंदरीत आजची प्रचार रॅली पाहता ,त्यामध्ये सहभागी झालेल्या प्रचंड जनसमुदाय पाहून जनतेचा आपल्याला किती पाठिंबा आहे हे यावरून निदर्शनास येते . आपण केलेली विकास कामे पाहून , जनता मला मागील वेळेपेक्षा दुप्पट मताधिक्याने निवडून देतील असा विश्वास आ . अभय पाटील यांनी व्यक्त केला . येत्या १० मे रोजी , मतदान केंद्रावर जाऊन , मला मतदान करा आणि पुन्हा एकदा विकास करण्याची संधी द्या असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले .

Tags: