National

‘मिस युनिव्हर्स’ सिएनाचं 23 व्या वर्षी निधन; घोडेस्वारी करताना झाला होता अपघात

Share

‘मिस युनिव्हर्स 2022’मध्ये आपल्या सौंदर्याचा जलवा दाखवणारी मॉडेल सीएना वीरचं निधन झालं आहे. वयाच्या अवघ्या 23 व्या वर्षी या सौंदर्यवतीने अखेरचा श्वास घेतला आहे. ऑस्ट्रेलियामध्ये घोडेस्वारी करताना तिचा अपघात झाला होता. त्यानंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण उपचारादरम्यान तिची प्राणज्योत मालवली.

‘मिस युनिव्हर्स 2022’ या स्पर्धेत सिएना शेवटच्या टप्प्यात पोहोचली होती. सिडनीच्या विद्यापीठातून तिने इंग्रजी साहित्य आणि मनोविज्ञान या विषयांत पदवीचं शिक्षण घेतलं आहे. आता पुढील शिक्षणासाठी ती ब्रिटनला जाण्याचा विचार करत होती. सिएना ही खूप प्रयोगशील होती. ती मॉडेलिंग क्षेत्रात नेहमी वेगवेगळे प्रयोग करत असे.

सिएनाच्या मृत्यूनंतर चाहते सोशल मीडियाच्या माध्यमातून शोक व्यक्त करत आहेत. ऑस्ट्रेलिअन फोटोग्राफर क्रिस ड्वायरने शोक व्यक्त करत लिहिलं आहे की,”जगातील सर्वात प्रेमळ व्यक्ती… अल्पावधीतच यश मिळवलसं पण आता सर्वत्र अंधार आहे.”. आमच्यासाठी तू कायम जिवंत असशील, तुझी आम्हाला आठवण येईल, अशा कमेंट्स करत चाहते शोक व्यक्त करत आहेत.

Tags: