election

खर्गे हत्या संदर्भातील ऑडिओ क्लिपची करणार चौकशी : मुख्यमंत्री बोम्मई

Share

 

मल्लिकार्जुन खर्गे आणि कुटुंबीयांच्या हत्येसंदर्भातील ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्या संदर्भात आम्ही गुन्हा नोंदवून त्याची चौकशी करू. असे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगितले .

शहरातील त्यांच्या निवासस्थानाजवळ बोलताना ते म्हणाले की, ऑडिओची सत्यता तपासली जाईल.
बी.एल.संतोष यांची लिंगायत मतांबाबतची बातमी खोटी आहे . याप्रकरणी यापूर्वीच तक्रार दाखल करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते बी. एल. संतोष यांनी, लिंगायत समाजाची मते आम्हाला नको असे कधीच म्हटलेले नाही. तशा आशयाची आलेली बातमी फेक न्यूज आहे असे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी स्पष्ट केले.

प्रचाराच्या अंतिम टप्प्यात मोदी प्रचारासाठी राज्यात येत आहेत. त्यांच्या येण्याने पक्षाला फायदा होईल. ३ जिल्ह्यात पक्षाचा प्रचार करण्याचे त्यांचे नियोजन आहे.
चित्रपट अभिनेता शिवराजकुमार काँग्रेसचा प्रचार करणार असल्याबाबतच्या प्रश्नावर, त्यांनी कोणाचा प्रचार करावा हे त्यांच्यावर अवलंबून आहे. प्रत्येकजण स्वतंत्र आहे. त्यांनी काँग्रेसचा प्रचार केला तर आमची काही हरकत नाही असे मुख्यमंत्री बोम्मई यांनी सांगितले.
सोनिया गांधी प्रचार करत आहेत. असा त्यांच्या पक्षाचा प्रचार आहे. मोदी आज येत आहेत. मोदी लाट आता पूर्वीपेक्षा अधिक मजबूत होईल, असे ते म्हणाले.

Tags: