Belagavi

महाराष्ट्र कबुतर केसरी स्पर्धेत बेळगावच्या युवकाचे यश

Share

महाराष्ट्र कबुतर केसरी या राष्ट्रीय स्तरावरील कबुतर उडविण्याच्या स्पर्धेत मुरली कृष्णोजी यांच्या कबुतराला तिसऱ्या क्रमांकाचे 1.15 लाखाचे बक्षीस मिळाले आहे. त्याबद्दल वीर मदकरी गर्जना संघातर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला.


महाराष्ट्र कबुतर केसरी या राष्ट्रीय स्तरावरील कबुतर उडविण्याच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. आयोजकांनी कणबर्गी येथे येऊन कबुतराच्या हवेत उडण्याची नोंद घेतली. या स्पर्धेमध्ये बेळगावच्या कणबर्गी येथील मुरली कृष्णोजी यांच्या कबुतराने तिसरा क्रमांक पटकावला आहे.
पहिल्यांदाच या स्पर्धेत भाग घेतलेल्या कणबर्गी येथील मुरली कृष्णोजी यांच्या कबुतराने 62 तास 28 मिनिटे उडण्याचा विक्रम करत ही कमाल केली आहे.

महाराष्ट्र केसरी स्पर्धेत या कबुतराने महाराष्ट्रात तिसरा क्रमांक तर कर्नाटकातून पहिला क्रमांक पटकावला आहे. या यशाबद्दल वीर मदकरी गर्जना संघटनेच्या वतीने नटराज नायडू यांच्याहस्ते मुरली कृष्णोजी यांचा विशेष सन्मान करून गौरविण्यात आले. फ्लो
यावेळी बोलताना नटराज नायडू आणि उमेश यांनी मुरली कृष्णोजी यांचे कौतुक करून अभिनंदन केले.

मुरली कृष्णोजी यांनी यावेळी सांगितले की, महाराष्ट्र कबुतर केसरी ही स्पर्धा कडक नियमांचे पालन करून घेतली जाते. स्पर्धेवेळी कबुतराला हाताळता येत नाही. भारतात कबुतरे उडविण्याच्या बाबतीत ही सर्वात मोठी स्पर्धा मानली जाते. बाईट
यावेळी वीर मदकरी गर्जना संघटनेचे उपाध्यक्ष विकास शिरूर, नटराज नायडू यांच्यासह इतर उपस्थित होते.

Tags: