बेळगाव जिल्हा खर्च संनियंत्रण नोडल अधिकारी परशुराम दुडगुंटी यांनी आज बेळगाव उत्तर मतदारसंघ आणि ग्रामीण मतदारसंघातील हिरेबागेवाडी, अरळीकट्टी, हत्तरगी आणि बाची या आंतरराज्यीय चेक पोस्टना भेट देऊन पाहणी केली.

मतदानाला आणखी चार दिवस शिल्लक असल्याने वाहनांची तपासणी अधिक तीव्र करण्याचे निर्देश त्यांनी चेकपोस्ट कर्मचाऱ्यांना दिले.
तपासणी प्रभावी करण्यासाठी अतिरिक्त तपासणी अधिकारी आणि पोलिसांची संख्या वाढवण्याची विनंती जिल्हाधिकाऱ्यांना करण्यात येणार आहे असे बी. दुडगुंटी यांनी सांगितले .
मतदानाचा दिवस जसजसा जवळ येईल तसतसे अवैध पैसे व वस्तूंची तस्करी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे बस, कार, दुचाकींचीही तपासणी करावी, असे जिल्हा खर्च नोडल अधिकाऱ्यांनी चेकपोस्ट कर्मचाऱ्यांना सांगितले.
यावेळी शीतल कुरणे व मंजुनाथ वेळगाईकर आदी सहाय्यक खर्च निरीक्षक, अधिकारी, पोलीस, निमलष्करी दलाचे कर्मचारी उपस्थित होते.


Recent Comments