Belagavi

जेडीएसचे उमेदवार शिवानंद मुगळीहाळ यांचा झंझावाती प्रचार

Share

 

बेळगाव उत्तर मतदार संघाचे जेडीएसचे उमेदवार शिवानंद मुगळीहाळ याना मतदारसंघातून भरघोस पाठिंबा लाभत आहे .


मतदारसंघात विविध ठिकाणी भेट देऊन ते आपला प्रचार करीत आहेत . यावेळी मतदारांकडून त्यांना चांगला पाठिंबा लाभत आहे . प्रचारादरम्यान मतदारांची भेट घेऊन , शिवानंद मुगळीहाळ यांनी जनतेशी त्यांच्या समस्यांसंदर्भात चर्चा करून त्या सोडवण्याचे आश्वासन दिले .

यावेळी ते म्हणाले कि , जनतेला आवश्यक असलेल्या मूलभूत सुविधा , रस्ते ,गटार , पाणी , लाईट

यासाठी गेल्या १२ वर्षांपासून लढा देत आहे . तुमच्या ज्या काही समस्या आहेत त्या आम्ही दूर करू . यासाठी तुम्ही जेडीएसला मतदान करा आणि निवडून द्या . यासाठी तुम्ही ठाम निर्णय घ्या असे ते म्हणाले .
यावेळी शिवानंद मुगळीहाळ यांचे समर्थक तसेच मतदार बंधू भगिनी मोठया संख्येने उपस्थित होत्या .

Tags: