Belagavi

बेळगाव उत्तर मतदारसंघातील पक्षविरहित उमेदवार अशोक गोवेकर यांना कणबर्गी व वीरभद्र नगर येथे मतदारांचा मोठा पाठिंबा लाभला

Share

बेळगाव उत्तर मतदारसंघातील पक्षविरहित उमेदवार अशोक गोवेकर यांना कणबर्गी व वीरभद्र नगर येथे मतदारांचा मोठा पाठिंबा लाभला .


प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते अशोक गोवेकर यावेळी बेळगाव उत्तर मतदारसंघात अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवीत आहेत. प्रारंभापासून समाजसेवेची आवड, तळमळ असलेल्या अशोक गोवेकर यांनी गेली कित्येक वर्षे निस्पृह आणि निस्वार्थ भावनेने समाजकार्य केले आहे. आमदार म्हणून निवडून आल्यास समाजकार्याची व्याप्ती वाढविता येईल या हेतूने ते यंदा बेळगाव उत्तर मतदारसंघातून अपक्ष म्हणून नशीब अजमावत आहेत.

आपले अनेक कार्यकर्ते, समर्थकांसह अशोक गोवेकर यांनी मतदारसंघात ठिकठिकाणी वेगवान प्रचार मोहीम राबवत आहेत. कणबर्गी व वीरभद्र नगर येथे त्यांनी प्रचार केला .
यावेळी अशोक गोवेकर म्हणाले की, मी माझे आयुष्य जनतेच्या सेवेसाठी समर्पित केले आहे”मी समाजसेवेत व्यस्त असून लोकांच्या कल्याणासाठी अहोरात्र काम करणार आहे. मला निवडून द्या . गरिबांच्या मुलांसाठी शाळा, रुग्णालये, पाणी, गरिबांसाठी रोजगार, अशा अनेक प्रकल्पांना मी प्राधान्य देईन.”…मोदींप्रमाणे मीही ब्रह्मचारी आहे आणि तुमच्या सेवेसाठी सदैव कार्यरत आहे..

या भागात गोवेकरांचे मतदारांनी स्वागत केलं . यावेळी कणबर्गी आणि वीरभद्र नगर येथील नागरिक… तसेच खालिद, आबा, अब्बास, उमर, झैन, वाहिद, आणि इतर उपस्थित होते

Tags: