कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेस १४० हुन अधिक जागा जिंकून स्पष्ट बहुमताने सत्तेत येईल असे एआयसीसीचे जनरल सेक्रेटरी आणि खा . जयराम रमेश यांनी सांगितले .

बेळगाव शहरात काँग्रेस भवनामध्ये आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले कि , कर्नाटकात भाजपाला पंतप्रधान मोदी तसेच गृहमंत्री अमित शाह याना बोलवून प्रचार करावा लागत आहे . तर काँग्रेसचा प्रचार राहुल गांधी , सिद्धरामय्या आणि डी के शिवकुमार करीत आहेत हा फरक आहे . राज्यात कॉग्रेसला स्पष्ट बहुमत मिळणार आहे असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला . राज्याच्या राजकारणात बदल व्हायला हवा . हे कमिशनचे सरकार जायला हवे असा मानसिक बदल होणे गरजेचे आहे . आम्हाला कुठलीच भीती नाही . भाजपचे डबल इंजिन सरकार खोटे सरकार आहे . १० तारखेची निवडणूक ही ऐतिहासिक निवडणूक होणार असून , हे निवडणूक कर्नाटकच्या भविष्याची निवडणूक ठरणार आहे .
आज काँग्रेसमध्ये भाजपचे माजी मुख्यमंत्री , उपमुख्यमंत्री तसेच लिंगायत , वक्कलिग यांच्यासहित सर्व जातीधर्माचे लोक दाखल झाले आहेत . या ४० % कमिशनच्या सरकारचा यायला नक्की पाडाव होईल असे सांगून त्यांनी अमित शाह यांच्यावर निशाणा साधला .
काँग्रेस जाहीरनाम्यातील बजरंग दलावरील बंदी संदर्भात माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले कि , बजरंग बली वेगळे आणि बजरंग दल वेगळे .. आपण सर्व बजरंग बलीचे भक्त आहोत . बजरंग दलाचे सदस्य नाही . २३ ऑगस्ट २०१४ रोजी , गोव्याचे तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर याची श्रीराम सेनेवर बंदी घातली होती . त्यावेळी , मोदी पंतप्रधान होते तरीही ते गप्प होते . तीन वर्षात ते बॅन रिन्यू झाले . श्रीराम सेने बॅन करायचा भाजपाला काय अधिकार ? तेव्हा श्रीरामाचा अपमान झाला नाही काय ? असा प्रश्न त्यांनी केला
यावेळी त्यांनी पत्रकारांनी विचारलेल्या विविध प्रश्नांची मुद्देसूद उत्तरे दिली .
या पत्रकार परिषदेत काँग्रेस प्रवक्ते आलोक शर्मा , रोहन गुप्ता , बेळगाव ग्रामीण जिल्हाध्यक्ष विनय नावलगट्टी , ऍड . चंद्रहास अणवेकर आदी उपस्थित होते .


Recent Comments