बेळगावच्या दक्षिण मतदार संघातील काँग्रेसच्या उमेदवार प्रभावती मास्तमर्डी यांचा लोकप्रिय विणकर नायिका, प्रसिद्ध सिनेतारका, राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या आणि माजी मंत्री उमाश्री यांनी प्रचार केला . यावेळी त्यांना मतदारांचा उत्स्फूर्त पाठिंबा मिळाला .

लोकप्रिय विणकर नायिका, प्रसिद्ध सिनेतारका, राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या आणि माजी मंत्री उमाश्री अम्मन यांनी बेळगाव दक्षिण विधानसभा मतदारसंघातील उपार गल्ली, भुवनेश्वरी गल्ली, कलमेश्वर रोड आणि मंगाई नगरात काँग्रेस उमेदवार प्रभावती मास्तमर्डी यांचा प्रचार केला.
यावेळी , मोठ्या संख्येने जमलेल्या लोकांनी त्यांचे भव्य स्वागत केले. या प्रचारावेळी प्रचंड संख्येने जनसमुदाय जमला होता . यावेळी माजी मंत्री उमाश्री यांनी भाजप सरकारने केलेली दरवाढ , भाजप सरकारचे अपयश त्याचप्रमाणे भाजपने केलेला भ्रष्टाचार याची सविस्तर माहिती देऊन , काँग्रेसने जाहीर केलेल्या जनप्रिय पाच गॅरंटीबद्दल माहिती देऊन ,काँग्रेस सत्तेत येताच पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीतच या सर्व योजना लागू करणार असल्याचे सांगितले .
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, कर्नाटक विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते बी के हरिप्रसाद यांनीही प्रचारात सहभाग घेतला आणि प्रभावती मस्तमर्डी यांना मतदान करून काँग्रेस पक्षाला विजयी करण्याचे आवाहन केले.
यावेळी प्रचंड संख्यने काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते तसेच या भागातील लोक उपस्थित होते .


Recent Comments