election

काँग्रेसच्या प्रचारादरम्यान दगडफेक : कार्यकर्त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत

Share

विजापूर जिल्ह्यातील मुद्देबिहाळ मतदारसंघात काँग्रेस उमेदवाराच्या प्रचारादरम्यान दगडफेकीची घटना घडली.


यावेळी शांता या महिला कार्यकर्त्याच्या डोक्याला दगड लागून दुखापत झाली . ही घटना विजयपूर जिल्ह्यातील मुद्देबिहाळ मतदारसंघातील गोनाल गावात घडली. काँग्रेसचे उमेदवार माजी मंत्री सीएस नाडगौडा यांच्या प्रचारादरम्यान ही दगडफेक केली. दगडफेक केल्याने जखमी झालेल्या महिलेला तातडीने स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले.

या द्गडफेकीच्या प्रकारामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. ही घटना तालिकोटे पोलीस ठाण्यांतर्गत घडली

Tags: