विजापूर जिल्ह्यातील बबलेश्वर भाजप उमेदवाराच्या मुलावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विजापूर शहरातील बबलेश्वर नाक्याजवळ हवेत गोळीबार केल्याप्रकरणी भाजपचे उमेदवार विजू गौडा पाटील यांचा मुलगा समर्थ पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच विजुगौडा पाटील यांना भाजपचे तिकीट जाहीर करण्यात आले हा आनंद साजरा करण्यासाठी त्याने हवेत गोळी झाडली होती .
यासंदर्भात काँग्रेस नेत्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन भाजपवर सडकून टीका केली. त्यावरून समर्थविरुद्ध शस्त्रास्त्र कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी गांधीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Recent Comments