बेळगाव उत्तर विधानसभा मतदारसंघातील जेडीएसचे उमेदवार शिवानंद मुगळीहाळ यांनी अनेक भागात समर्थक आणि कार्यकर्त्यांसह जोरदार प्रचारमोहीम राबवली. यावेळी त्यांचे अनेक ठिकाणी भव्य स्वागत करून समर्थन व्यक्त करण्यात आले.


विधानसभा निवडणूक जवळ येईल तशी प्रचारात रंगत वाढू लागली आहे.

अनेक राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी प्रचाराला गती दिली आहे. बेळगाव उत्तर मतदारसंघातील जेडीएसचे उमेदवार शिवानंद मुगळीहाळ यांनीदेखील झंझावाती प्रचार सुरु केला आहे. आपले समर्थक, जेडीएस कार्यकर्त्यांच्या टीमसह त्यांनी घरोघरी मतदारांशी संपर्क साधत निवडून देण्याचे आवाहन केले. यावेळी महिलांनी त्यांना आरती ओवाळून, टिळा लावून विजयासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी बोलताना स्थानिक रहिवाशांनी उत्तर विधानसभा मतदारसंघात जेडीएस फटाक्यांची आतषबाजी करेल इतके समर्थन देऊ असे आश्वासन शिवानंद मुगळीहाळ यांना दिले


Recent Comments