election

लोंढा गावात आ . अंजली निंबाळकर यांचा जोरदार प्रचार

Share

खानापूर तालुक्यातील ;लोंढा गावात आमदार डॉ.अंजली निंबाळकर यांनी जोरदार प्रचार केला . यावेळी जनतेच्या त्यांना भरघोस पाठिंबा मिळाला .
व्हॉईस ओव्हर : आ . अंजली निंबाळकर यांनी केलेल्या विकासकामांची खात्री जनतेला पटली आहे . आणि 10 तारखेला काँग्रेस पक्षाला मतदान करण्याचा आशीर्वाद जनतेने दिलाआहे .

यावेळी प्रचार सभेत बोलताना डॉ . अंजली निंबाळकर यांनी भाजप सरकारचे अपयश जनतेसमोर मांडले . त्या म्हणाल्या कि , भाजप सरकारच्या काळात गॅस दर वाढले , जीवनावश्यक वस्तूंचे दर गगनाला भिडले . लहान मुलांच्या दुधावरही जीएसटी लावला.भाजप सरकारच्या मंत्री आणि नेत्यांना लाज वाटली पाहिजे .गांधी नगरमध्ये घरे पूर्ण पाण्यात बुडाली. कोरोना आणि अतिवृष्टीत एकही घर दिले नाही. या भ्रष्ट सरकारला उलथवून टाकून , काँग्रेसला निवडून आणा . काँग्रेसने दिलेले हमीपत्र सत्तेत येताच तात्काळ लागू करू .

महिलांना बसप्रवास मोफत , शिवाय कुटुंब प्रमुख महिलेच्या खात्यात दरमहा दोन हजार रुपये जमा करणार , दरमहा २०० युनिट वीज मोफत देणार असा कित्येक जनप्रिय योजना काँग्रेस अमलात आणणार आहे . यासाठी तुम्ही काँग्रेस पक्षाला निवडून द्या ते त्या म्हणाल्या .

यावेळी रोड शो मध्ये गी महिलांनी आमदार डॉ.अंजली निंबाळकर यांचे आरती ओवाळून स्वागत केले.शेकडो तरुण व महिला ग्रामस्थांनी आमदार डॉ.अंजली निंबाळकर यांचे अभूतपूर्व स्वागत व पाठींबा दिला.सर्वसाधारणपणे काँग्रेस पक्षाला मतदान करावे. आणि खानापूर तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी मदत करण्याचे आवाहन त्यांनी केले .

Tags: