आपल्या वडिलांच्या प्रचारासाठी काँग्रेस पक्षाचे युवा नेते व केपीसीसी कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी यांचे सुपुत्र राहुल जारकीहोळी यांनी मतदार संघात भव्य बाईक रॅली काढून प्रचार केला.


यमकनमर्डी मतदार संघातील काँग्रेसचे उमेदवार सतीश जारकीहोळी यांचा प्रचार जोरात सुरु आहे. आज शुक्रवारी त्यांचे पुत्र राहुल जारकीहोळी यांनी कडोली जिल्हा पंचायत मतदार संघात भव्य बाईक रॅली काढून प्रचार केला. अलतगा येथून प्रारंभ झालेली ही बाईक रॅली जाफरवाडी, अगसगा, कडोली, हंदिगनूर, केदनूर, आदी गावांमध्ये शेकडो कार्यकर्त्यांसमवेत त्यांनी प्रचार केला. गावोगावी जाऊन काँग्रेसला मतदान करण्याचे आवाहन केले.

फ्लो
यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना राहुल जारकीहोळी म्हणाले की, संपूर्ण यमकनमर्डी मतदार संघात आपले वडील सतीश जारकीहोळी यांना चांगले समर्थन मिळत आहे. गेली १५ वर्षे ते या मतदारसंघात अनेक चांगली विकासकामे केली आहेत. यावेळीही निवडून आल्यावर ते निश्चितपणे या भागाच्या विकासासाठी प्रयत्न करतील असे सांगितले.
यावेळी केपीसीसी सदस्य मलगौडा पाटील, माजी जिप उपाध्यक्ष कटाम्बळे, भाऊराव गडकरी यांच्यासह अनेक कार्यकर्ते, समर्थक उपस्थित होते.


Recent Comments