Belagavi

कार्यकर्त्यांच्या प्रवेशामुळे भाजप सर्वात मजबूत : मंत्री शशिकला जोल्ले

Share

निपाणी मतदारसंघातील विकासकामांमुळे प्रभावित झालेल्या श्रीपेवाडी भागातील कार्यकर्त्यांनी कॉंग्रेस पक्ष सोडून भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यांच्या प्रवेशामुळे भाजप सर्वात मजबूत झाल्याची प्रतिक्रिया मंत्री शशिकला जोल्ले यांनी व्यक्त केली.

श्रीपेवाडी गावच्या माजी ग्रामपंचायत अध्यक्षा लीलाबाई कुंभार, माजी ग्रामपंचायत सदस्य दिनकर शिंपुकडे, मनोज शिंपुकडे, मोहन कुंभार, रावसाहेब शिंपुकडे, बाबुराव शिंपुकडे, प्रभाकर शिंपुकडे, बाळासो पाटील, कु. सुनिता शिंपुकडे, सौ. शिंपुकडे, कु. राजश्री पाटील, सौ. बेबीताई शिंपुकडे व त्यांच्या 25 हून अधिक कार्यकर्त्यांनी कॉंग्रेस पक्ष सोडून भाजपमध्ये प्रवेश केला. धर्मादाय, हज व वक्फ विभागाच्या मंत्री सौ.शशिकला जोल्ले यांनी त्यांचे जंगी स्वागत केले.

Tags: