Belagavi

अनगोळ परिसरात अभय पाटील यांचा भव्य रोड शो

Share

बेळगाव दक्षिणमधील भाजप उमेदवार अभय पाटील यांनी हजारो समर्थकांसह अनगोळ परिसरात भव्य रोड शो काढून जोरदार प्रचार मोहीम राबवली.


अनगोळ नाका येथून सायंकाळी रोड शोला प्रारंभ झाला. त्यानंतर प्रमुख मार्गावरून ही मिरवणूक गेली.

प्रारंभी नगरसेविका वाणी जोशी आदींनी आरती करून त्यांना शुभेच्छा दिल्या. भाग्यनगर येथील रहिवासी मधु गुरव व इतरांनी पुष्पहार घालून मंत्रोच्चार केला. एका खुल्या जीपमध्ये उभे राहून उमेदवार अभय पाटील मतदारांना अभिवादन करत होते.
संपूर्ण मिरवणुकीत महिलांसह असंख्य लोकांनी अभय पाटील यांच्यावर पुष्पवृष्टी केली.

यावेळी महापौर शोभा सोमण्णाचे, नगरसेविका श्रीशैल कांबळे, अभिजित जवळकर आदी उपस्थित होते.

मिरवणुकीत अपेक्षेपेक्षा जास्त लोक जमल्याने काही ठिकाणी वाहतूक विस्कळीत झाली होती.

Tags: