बेळगाव दक्षिण मतदार संघाचे भाजपचे उमेदवार अभय पाटील यांच्या प्रचारार्थ , महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रचार सभा घेऊन, कर्नाटकाच्या विकासासाठी डबल इंजिन सरकार आवश्यक असल्याने, भाजपला मतदान करा आणि अभय पाटील याना निवडून द्या असे आवाहन त्यांनी केली .
बेळगाव दक्षिण मतदार संघाचे भाजपचे उमेदवार अभय पाटील यांच्या प्रचारार्थ
घेतलेल्या जाहीर सभेत बोलताना , देवेंद्र फणवीस यांनी मोदी सरकारने केलेल्या देशाच्या विकासाबद्दल
माहिती दिली . ते म्हणाले कि , आज आपली अर्थव्यवस्था ज्या वेगाने वाढत आहे ती पाहता २०३० पर्यंत भारत जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था बनेल . भारत विकसित बनेल . काँग्रेसच्या पंतप्रधानांनी स्वतः सांगितले होते कि , कुठल्याही योजनेचा निधी लाभार्थ्यांपर्यंत पोचेपर्यंत त्यात ८५ % इतका भ्रष्टाचार होतो . ही व्यवस्था मोदींनी बदलली . सर्व योजनांचे थेट अनुदान , लाभार्थ्यांच्या खात्यात थेट जमा केले . त्यामुळे योजनेत होणार भ्रष्टाचार थांबला .
मोदींनी देशाच्या अर्थव्यवस्थेत आमूलाग्र बदल घडवला आहे . दोन वर्षांपूर्वी कोरोना काळात मोदींनी आपली देशात तयार झालेली लस १३० कोटी जनतेला मोफत दिली . शिवाय अन्य ४० देशांना ही लस दिली . मोदींनी देशाला आत्मनिर्भर पॅकेज दिले . कोविड नंतर जगातील सर्व देश मंदीत गेले होते . मात्र पंतप्रधान मोदी यांच्या मुळे भारताची अर्थव्यवस्था ढासळली नाही . कर्नाटकाचा मोठ्या प्रमाणावर विकास व्हायचा असेल तर डबल इंजिन सरकार सत्तेत असायला हवे . तेच कर्नाटकाच्या विकासाला गती देईल असे ते म्हणाले . यासाठी अभय पाटील याना आशीर्वाद देऊन , भाजपाला सत्तेत आणायचे आवाहन त्यांनी केले .


Recent Comments