election

आ . अंजली निंबाळकर यांचा इटगी येथे रोड शो मतदारांचा भरघोस पाठिंबा शेकडो युवकांचाही काँग्रेसमध्ये प्रवेश

Share

खानापुरच्या आमदार डॉ.अंजली निंबाळकर यांनी खानापुर तालुक्याच्या पूर्व भागातील मध्यवर्ती व मुख्य ठिकाण असलेल्या इटगी येथे रोड शो केला.यावेळी कार्यकर्त्यां घोषणाबाजी केली .
यावेळी बोलताना अंजली निंबाळकर म्हणाल्या की, त्यांनी आपल्या कार्यकाळात अनेक विकासकामे केली आहेत, पाटबंधारे विभागाने शेतकऱ्यांच्या हितासाठी तलाव भरणे प्रकल्प, रस्त्यांची कामे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असे अनेक प्रकल्प राबवले असून मी केलेली विकासकामे पाहून मला मतदान करा .

यावेळी आमदार डॉ.अंजली निंबाळकर यांच्या उपस्थितीत इटगी,बेडरट्टी ,बोगुर,करवीणकोप्प गावातील शेकडो युवकांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.पूर्वेकडील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या इटगी येथे आमदार डॉ.अंजली निंबाळकर यांना अभूतपूर्व पाठिंबा मिळाला आणि काँग्रेस डॉ. अंजली निंबाळकर पुन्हा आमदार होणार यात शंका नाही, अशी चर्चा तेथील लोकांमध्ये होती.

Tags: