बेळगावच्या रेल्वे स्टेशनला , शिव बसव स्वामीजींचे नाव देण्यासाठी आपण सातत्याने लढा देणार आहोत असे राजू टोपण्णावर म्हणाले.
बेळगाव उत्तर मतदारसंघातील आम आदमी पक्षाचे उमेदवार, कन्नड समर्थक राजकुमार टोपण्णावर यांनी नागनूर मठ, लिंगैक्य डॉ. शिवबसव महास्वामी यांचे नाव रेल्वे स्थानकाला देण्यासाठी आयुष्याच्या शेवटपर्यंत लढण्याचा संकल्प केला आहे.
याबाबत त्यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे बेळगावच्या , नागनूर मठाचे लिंगैक्य डॉ. शिव बसव महास्वामी, अन्न दासोह, अक्षरा दासोहमुळे लाखो युवकांनी उच्च शिक्षण घेऊन उपजीविका केली आहे, बेळगावची जनता महास्वामींची सेवा कधीच विसरू शकत नाही, डॉ. शिव बसव महास्वामी यांच्या कन्नड समर्थक लढ्याचे फलित म्हणून बेळगाव ही कन्नड भूमी असल्याचे ते म्हणाले. त्यांचे स्मारक बेळगावात व्हावे, असा टोपण्णावर यांचा आग्रहआहे .
बेळगाव रेल्वे स्थानकाला डॉ.शिवबसव महास्वामी यांचे नाव न देता काँग्रेस आणि भाजप सरकारने अन्याय केला आहे. महात्माजींची सेवा आजच्या व भावी पिढ्यांना कळली पाहिजे आणि त्यासाठी त्यांचे नाव घेतले पाहिजे, या प्रश्नाकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी बेळगावात सातत्याने लढा देण्याचे आश्वासन टोपण्णावर यांनी दिले आहे.


Recent Comments