Belagavi

गणेशपूर येथे शिवसेना भवनाचे खा. संजय राऊत यांच्याहस्ते उदघाटन

Share

छत्रपती शिवराय आणि शिवसेना संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांच्या जयघोषात बेळगावातील गणेशपूर मुख्य रस्त्यावर सुरु केलेल्या नूतन शिवसेना भवनाचे उदघाटन खा. संजय राऊत यांच्याहस्ते थाटात पार पडले.

गणेशपूर येथील कट्टर शिवसैनिक राजू तुडयेकर यांच्या मालकीच्या इमारतीत शिवसेना भवन स्थापन करण्यात आले आहे.

आज शिवसेनेचे खा. संजय राऊत यांच्याहस्ते त्याचे फीत कापून थाटात उदघाटन करण्यात आले. यावेळी फटाक्यांची आतषबाजी करून छत्रपती शिवाजी महाराज की जय, बाळासाहेब ठाकरे की जय, बेळगाव, करावा, खानापूर, निपाणी, बिदर, भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे अशा जोरदार घोषणा शिवसैनिकांनी दिल्या. फ्लो
यावेळी बोलताना शिवसेना शहरप्रमुख बंडू केरवाडकर म्हणाले की, गणेशपूर येथे राजू तुडयेकर यांच्या मालकीच्या इमारतीत आज शिवसेना भवनाचे खा.

संजय राऊत यांच्याहस्ते उदघाटन होतेय ही आनंदाची बाब आहे. येथे शिवसेनेच्या तत्वानुसार गोरगरिबांना मदत करणे आदी विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात येतील असे त्यांनी सांगितले.

यावेळी राजू तुडयेकर यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags: