अथणी शहरात आम आदमी पक्षाचे नेते विनायक देसाई यांनी त्यांच्या समर्थकांसह काँग्रेस पक्षात प्रवेश केला.


यावेळी अथणी विधानसभा काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार लक्ष्मण सवदी म्हणाले कि ,
गेली अनेक वर्षे काँग्रेस पक्षासाठी काम केलेले विनायक देसाई मूळ काँग्रेस पक्षात दाखल झाले आणि जणू घरी परतल्यासारखे माझ्या पाठिशी उभे राहिले.त्यांच्या अनेक समर्थकांसह काँग्रेस पक्षाने आम्हाला ताकद दिली आहे. येत्या दहा तारखेपर्यंत आमच्या वतीने प्रचारात सहभागी होऊन जास्तीत जास्त मते मिळवून मला विजयी करण्याचे काम विनायक देसाई यांच्यासह समाजातील सदस्य करणार आहेत , तरुण आणि चाहते देखील पाठिंबा देतील अशी आशा आहे असे अथणी विधानसभा काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार लक्ष्मण सवदी यांनी सांगितले.
विनायक देसाई म्हणाले की, गेल्या सात-आठ महिन्यांपासून आम आदमी पक्षात प्रवेश केला होता . मात्र आता सवदी याना प्रचंड मताधिक्याने निवडू आणण्यासाठी , आणण्यासाठी आज काँग्रेस पक्षात प्रवेश केला.काँग्रेसचा उमेदवार अधिक मतांच्या फरकाने विजयी व्हावा यासाठी आम्ही काम करणार असल्याचे ते म्हणाले.
यावेळी विनायक देसाई, युवराज देसाई, गजानन पाटील, केशव पाटील (वाजपेयी), धैर्यशील देसाई, शिवाजी निक्कम, मुरगेश अपराज, अविनाश पाटील, विजय कवठेकर, सुरेश नंदीवाले आदी उपस्थित होते.


Recent Comments