बेळगाव दक्षिणच्या काँग्रेसच्या उमेदवार प्रभावती मास्तमर्डी यांनी , आपल्या मतदारसंघातील मजगाव भागात जाऊन मतयाचना केली .
काँग्रेसच्या उमेदवार प्रभावती मास्तमर्डी , यांनी प्रचारादरम्यान , मजगाव च्या जनतेशी संवाद साधला . ज्येष्ठ व तरुण सध्याच्या सरकारच्या कुशासनाला कंटाळले असून त्यांना पूर्वीप्रमाणेच लोकाभिमुख काँग्रेसचे सरकार हवे आहे असे यावेळी इथल्या जनतेने सांगितले .
यावेळी प्रभावती मास्तमर्डी म्हणाल्या कि , ज्या ज्या ठिकाणी प्रचारासाठी जात आहे त्या ठिकाणी लोक पिण्याचे पाणी, सांडपाणी व्यवस्था, दरवाढ आदींबाबत आपल्या समस्या मांडत आहेत . आणि जनतेच्या ह्या समस्या फक्त काँग्रेस सरकारच सोडवू शकते, त्यामुळे त्यांनी यावेळी काँग्रेस पक्षाला मतदान करण्याचा निर्णय घेतला आहे.

यावेळी उमेदवार प्रभावती मास्तमर्डी यांनी काँग्रेसच्या लोकप्रशासनाच्या योजना, 5 हमी, बेळगावच्या दक्षिणेसाठी आखलेल्या प्रकल्पांची माहिती दिली आणि काँग्रेसला मतदान करण्याचे आवाहन केले .
यावेळी प्रभावती मास्तमर्डी यांचे समर्थक आणि काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते .


Recent Comments