काँग्रेसच्या उमेदवार तसेच खानापुरच्या आमदार डॉ . अंजली निंबाळकर यांची जोरदार प्रचार मोहीम सुरु आहे . खानापूर तालुक्यातील जांबोटी गावात रोड शो तसेच प्रचार सभेचे आयोजन करून , काँग्रेसला पाठिंबा देण्याचे आवाहन त्यांनी केले .
आ . अंजली निंबाळकर यांचा खानापुरातील गावोगावी जोरदार प्रचार सुरु असून त्यांना मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे .खानापूर तालुक्यातील जांबोटी गावातील कार्यक्रमात आमदार डॉ.अंजलीताई हेमंत निंबाळकर व माजी मंत्री पलूस-कडेगाव चे विद्यमान आमदार विश्वजीत कदम यांनी सहभाग घेतला व डॉ.अंजलीताईंच्या चाहत्यांनी रोड शो व कॉर्नर सभा घेतली.

यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचा जयजयकार करून , आ . अंजली निंबाळकर यांनी तालुक्याच्या जनतेने , काँग्रेसला आशीर्वाद द्यावा असे आवाहन केले . येत्या काळात काँग्रेसचीच सत्ता येणार असल्याचे त्या म्हणाल्या . भ्रष्ट भाजप सरकारला सत्तेपासून दूर ठेवून , सर्वांगीण विकासासाठी , जनहिताचे काँग्रेस सरकार आणण्यासाठी काँग्रेसला मतदान करा असे आवाहन आ . अंजली निंबाळकर यांनी केले .
यावेळी या भागातील शेकडो नागरिक , महिला, युवक उपस्थित होते . त्यांनी आ . अंजली निंबाळकर यांना संपूर्ण पाठिंबा दर्शवला आहे


Recent Comments