रोजच्या भांडणाला कंटाळून पतीने पत्नीची हत्या केल्याची घटना चिक्कोडी तालुक्यातील सदलगा शहरात घडली आहे.
कुटुंबात काही ना काही कारणावरून रोजच भांडणे होत असतात, मात्र सदलगा शहरात अशा भांडणावरून पतीने पत्नीचा खून केल्याची घटना घडली आहे.
सदलगा शहरातील अशोक भीमा माने याने पत्नीचा खून केल्याचा आरोप आहे. पत्नी सुजाताचा खून केल्यानंतर तो स्वतः सदलगा पोलीस ठाण्यात हजर झाला आणि गुन्ह्याची कबुली दिली. घटना घडलेल्या ठिकाणी पीएसआय आणि कर्मचाऱ्यांनी भेट देऊन पंचनामा केला. गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे.
Recent Comments