Chikkodi

शशिकला जोल्ले यांचा झंझावाती प्रचार : मोठ्या संख्येनें विजयी करण्याचे आवाहन

Share

मी नेहमीच मतदारसंघातील जनतेच्या सोबत असते . गेल्या निवडणुकीत तुम्ही पाठिंबा दिला आणि भरघोस मतांनी विजयी झाले . त्याचप्रमाणे यावेळीही अधिक मतांनी पाठिंबा द्या, असे स्थानिक आमदार व धर्मादाय आणि हज व वक्फ मंत्री श्रीमती शशिकला जोल्ले यांनी सांगितले.

निप्पाणी विधानसभा मतदारसंघातील तवंदी , यरनाळ, शिरगुप्पी, कुर्ली आणि भटनागनूर गावात झंझावाती प्रचार करण्यात आला .

यावेळी , त्यांनी सांगितले कि मी गेल्या 10 वर्षात तवंदी गावात 6 कोटींची अतिरिक्त कामे, यरनाळ गावात 13 कोटी 50 लाख रु .ची अतिरिक्त कामे, शिरगुप्पी गावात 18 कोटींची अतिरिक्त कामे, कुर्ली गावात 18 कोटींची अतिरिक्त कामे, भटनागनूर गावात 26 कोटींची अतिरिक्त कामे, 8 कोटींची वाढीव विकासकामे हाती घेण्यात आली आहेत. मी गावात रस्ते, गटारी , घरोघरी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, अंगणवाडी, मंदिराची देखभाल अशी अनेक कामे केली आहेत. तुम्ही मला नेहमीच क्षेत्रात विकासकामे करण्याची संधी दिली आहे. या क्षेत्राच्या पुढील विकासासाठी आणखी एक संधी देण्याची विनंती त्यांनी केली.

 

 

मतदारसंघातील भाजप नेते आणि शेकडो महिलांनी निवडणूक प्रचारात भाजप उमेदवार शशिकला जोल्ले यांना पाठिंबा दिला.

Tags: