Belagavi

दक्षिणमध्ये अभय पाटील यांच्यासाठी किच्चा सुदीपचा भव्य रोड शो

Share

बेळगाव दक्षिण मतदारसंघात प्रसिद्ध कन्नड अभिनेता किच्चा सुदीप यांनी भव्य रोड शो केला. भाजप दक्षिण मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार व सक्रिय आमदार अभय पाटील यांचा प्रचार करत त्यांना प्रचंड मतांनी निवडून देण्याचे आवाहन सुदीप यांनी केले.

 

कुंदानगरी बेळगाव शहरात आलेल्या अभिनेता किच्चा सुदीपने बेळगाव दक्षिण मतदारसंघात रोड शोच्या माध्यमातून भाजपचा मोठा प्रचार केला.

खासबागच्या बसवेश्वर सर्कल येथून निघालेली ही मिरवणूक वडगाव येथे पोहोचली. आपल्या आवडत्या अभिनेत्याला पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. पोलिसांनी चाहत्यांना पांगविण्याचा आटोकाट प्रयत्न केला. भाजपचे उमेदवार अभय पाटील यांना मतदान करण्याची विनंती सुदिपने चाहत्यांना केली.

सजवलेल्या वाहनातून प्रचारादरम्यान भाजप महानगरचे अध्यक्ष आ. अनिल बेनके यांच्यासह अभय पाटील आणि किच्चा सुदीप यांनी रोड शो करत मतदारांना अभिवादन केले. आपल्या आवडत्या अभिनेत्याला पाहण्यासाठी हजारो चाहते जमले होते.

Tags: