Belagavi

आम आदमी पक्षाचे उमेदवार राजकुमार टोपण्णावर याना वाढता पाठिंबा

Share

बेळगाव उत्तर मतदारसंघातील आम आदमी पक्षाचे उमेदवार राजकुमार टोपण्णवार सकाळपासूनच त्यांच्या मोठ्या समर्थकांसह , महांतेश नगर भागात घरोघरी जाऊन मतयाचना केली .

आम आदमी हा लोकांच्या समस्यांना प्रतिसाद देणारा पक्ष आहे. पाच वर्षांत अविकसित उत्तर मतदारसंघाचा विकास करण्याची संधी आम आदमी पक्षाला देऊन मला आशीर्वाद द्यावा, अशी विनंती त्यांनी मतदारांना केली.

शहरात मूलभूत सुविधांचा अभाव आहे. आम्ही काँग्रेस आणि भाजपला अनेकदा पाठिंबा दिला आहे.

 

मात्र निवडून आलेल्या आमदारांनीही आमची अडचण पूर्ण केलेली नाही. त्यामुळे यावेळी मतदार संघातील जनतेने आम आदमी पक्षाला पाठिंबा देणार असल्याची ग्वाही टोपण्णवार यांना दिली.
यावेळी शिवानंद कारी, रवींद्र बेल्लद , शंकर हेगडे, एम के सय्यद आदी उपस्थित होते.

Tags: