Banglore

भाजप देणार बीपीएल कुटुंबांना दररोज अर्धा लिटर नंदिनी दूध, तीन मोफत सिलेंडर

Share

राज्यातील बेघरांना दहा लाख घरे, बीपीएल कुटुंबांना दररोज अर्धा लिटर नंदिनी दूध, वर्षातून तीन एलपीजी सिलिंडर मोफत देण्यासह विविध आश्वासनांची खैरात करणारा 6 कलमी जाहीरनामा भाजपने आज जाहीर केला. समान नागरी संहिता आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणीच्या अंमलबजावणीचे आश्वासनही यात दिले आहे.

कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी आज पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध केला, ज्यामध्ये समान नागरी संहिता आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणीच्या अंमलबजावणीचे आश्वासन दिले आहे. पक्षाने बीपीएल कुटुंबांना वर्षातून तीन एलपीजी सिलिंडर मोफत देण्याचे आश्वासन दिले आहे. युगादी (गुढीपाडवा), गणेश चतुर्थी आणि दीपावली सणाच्या महिन्यात प्रत्येकी एक सिलेंडर देण्याचे आश्वासन दिले आहे. तसेच ‘पोषण’ योजना सुरू करणार आहे ज्याद्वारे प्रत्येक बीपीएल कुटुंबाला दररोज अर्धा लिटर नंदिनी दूध आणि मासिक रेशन किटद्वारे पाच किलो तृणधान्य दिले जाईल.

अपार्टमेंट रहिवाशांचे जीवन सुलभ सुधारण्यासाठी कर्नाटक अपार्टमेंट ओनरशिप कायदा, 1972 मध्ये सुधारणा करण्यासाठी आणि तक्रार निवारण यंत्रणेचे आधुनिकीकरण करण्यासाठी कर्नाटक निवासी कल्याण सल्लागार समिती स्थापन करण्यात येतील असे नड्डा यांनी यावेळी सांगितले.

भाजपच्या निवडणूक जाहीरनाम्यातील महत्त्वाचे मुद्दे :
राज्यभरात परवडणारे आणि दर्जेदार जेवण देण्यासाठी प्रत्येक महापालिकेच्या प्रत्येक प्रभागात अटल आहार केंद्र सुरू करणार. ‘सर्वरिगु सुरु योजने’ अंतर्गत बेघरांसाठी 10 लाख घरे बांधून देणार. ‘ओनके ओबव्वा सामाजिक न्याय निधी’ योजनेअंतर्गत एससी/एसटी महिलांनी केलेल्या पाच वर्षांच्या मुदत ठेवींवर 10,000 रुपयांपर्यंत जुळणारी ठेव प्रदान करणार. विश्वेश्वरय्या विद्या योजनेंतर्गत सरकारी शाळांच्या सर्वांगीण उन्नतीसाठी सरकार प्रतिष्ठित व्यक्ती आणि संस्थांसोबत भागीदारी करेल. तरुणांना आयएएस/केएएस/बँकिंग/सरकारी नोकऱ्यांसाठी कोचिंगचा पाठपुरावा करण्यासाठी आर्थिक प्रोत्साहन देणार. समाजातील सर्व घटकांच्या अपेक्षा लक्षात घेऊन हा जाहीरनामा तयार करण्यात आला असून, त्याचे स्वागत होईल असा विश्वास नड्डा यांनी व्यक्त केला. आमचे डबल इंजिन सरकार आहे तर काँग्रेसचे ट्रबल इंजिन सरकार आहे. आमच्या सरकारने कर्नाटकात मोठा विकास केला आहे. त्यामुळे जनता या निवडणुकीत भाजपला पुन्हा संधी देयक असा विश्वास नड्डा यांनी व्यक्त केला बाईट
मुख्यमंत्री बसवराज बोम्मई म्हणाले की, डॉ. सुधाकर यांच्या नेतृत्वाखालील जाहीरनामा समितीने युवक, महिला, शेतकरी, कष्टकरी अशा सर्व समाजघटकांच्या सल्ला-सूचना, तज्ज्ञांची मते विचारात घेऊन हा जाहीरनामा तयार केला आहे. गरीबांसाठी 10 किलो धान्य: पाच किलो तांदूळ आणि पाच किलो बाजरी,
आयुषमान भारत योजनेंतर्गत विमा संरक्षण सध्याच्या पाच लाख रुपयांवरून 10 लाख रुपये करण्यात येणार आहे. सर्व तालुक्यांमध्ये केमोथेरपी आणि डायलिसिस केंद्रे उभारण्यात येतील असे त्यांनी सांगितले.

माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा म्हणाले की, सर्व समाजघटकांना नजरेसमोर ठेवून हा जाहीरनामा तयार केला आहे. आता कार्यकर्त्यांनी जनतेला तो समजावून सांगितला पाहिजे. राज्यातील जनता या जाहीरनाम्याचे स्वागत करून भाजपला पुन्हा सत्तेत आणेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

यावेळी भाजप प्रचारसमितीच्या अध्यक्षा केंद्रीय मंत्री शोभा करंदलाजे, आरोग्यमंत्री डॉ. सुधाकर, महसूल मंत्री आर. अशोक आदी उपस्थित होते.

Tags: