बेळगाव दक्षिणच्या काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार प्रभावती मास्तमर्डी यांनी पिरणवाडी गावात आयोजित भव्य प्रचार सभेत सहभागी होऊन काँग्रेस पक्षाला मतदान करून निवडून आणण्याचे आवाहन केले .
पिरणवाडी येथील भगवान बीरलिंगेश्वर मंदिरात बेळगाव दक्षिणच्या काँग्रेसच्या उमेदवार प्रभावती मास्तमर्डी यांनी पूजा करून आशीर्वाद घेतला . त्यानंतर , जाहीर सभेत बोलताना त्यांनी काँग्रेसला पाठिंबा देण्याचे आवाहन करून , काँग्रेसने जाहीर केलेल्या हमीपत्राविषयी माहिती दिली . यावेळी त्यांनी भाजपच्या भ्रष्ट कारभाराबद्दल ताशेरे ओढले .
प्रचार सभेला जमलेल्या शेकडो लोकांनी काँग्रेस पक्षाला पाठिंबा जाहीर केला.
लोकांचा उत्साह पाहता काँग्रेस पक्ष निवडून येईल आणि प्रगती करेल याचा पुरावा आहे.

सध्या जनतेला पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई भेडसावत असून काँग्रेस पक्षाची सत्ता आल्यास त्यांना मुलभूत सुविधा देण्यासाठी पावले उचलली जातील असे आश्वासन प्रभावती मास्तमर्डी यांनी दिले .
यावेळी शेकडोंच्या संख्येने , मतदार बंधुभगिनी उपस्थित होत्या


Recent Comments