बेळगाव दक्षिणच्या काँग्रेसच्या उमेदवार प्रभावती मस्तमर्डी यांनी , महाद्वार_रोड – कपिलेश्वर मंदिर परिसरात आज घरोघरी भेट देऊन प्रचार केला. स्थानिकांनी त्यांचे आदरपूर्वक स्वागत केले. निवडणुकीत काँग्रेस पक्षाला साथ देणार असल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

काँग्रेस उमेदवार प्रभावती मास्तमर्डी यांच्या प्रचारादरम्यान , स्थानिकांनी आपल्या अनेक समस्या मांडल्या . . त्यात त्यांनी पिण्याच्या पाण्याची समस्या, ड्रेनेज व्यवस्थेचा अभाव, स्वच्छतेचा अभाव, योग्य रस्त्यांचा अभाव आदीं समस्या असल्याचे त्यांनी सांगितले .

या निवडणुकीत काँग्रेस पक्ष विजयी झाला तरच मतदारसंघाचा विकास शक्य असल्याचे सांगण्यात आले. त्याशिवाय, काँग्रेसच्या 5 हमी लोकांना समजावून सांगितल्या आणि लोकाभिमुख प्रकल्प राबवता यावेत यासाठी यावेळी न चुकता काँग्रेसला मतदान करण्याची विनंती केली.
यावेळी प्रभावती मास्तमर्डी यांचे समर्थक आणि काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येनें उपस्थित होते .


Recent Comments