केपीसीसी कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी यांनी यमकनमर्डी मतदारसंघातील हत्तरकी ठाणे आणि पाश्चापूर जिल्हा पंचायत व्याप्तीतील इस्लामपूर, शहाबंदर , चिकलदिन्नी , गेजपती ,गुडगुद्दी , राजरट्टी , आणि यल्लापूर गावाना भेटी देऊन , वार्ड आणि बूथस्तरीय कार्यकर्त्यांच्या सभा घेतल्या .
यावेळी त्यांनी येत्या , दहा मे रोजी होणाऱ्या निवडणुकीत , काँग्रेसला मतदान करून , गेल्या १५ वर्षापासुनसची विकासाची परंपरा सुरु ठेवण्यासाठी समर्थन देण्याचे आवाहन केले .

यावेळी , माजी जिल्हा व तालुका पंचायत सदस्य , ग्राम पंचायत अध्यक्ष , उपाध्यक्ष आणि सदस्य तसेच , काँग्रेस कार्यकर्ते व जारकीहोळी समर्थक मोठया संख्येनें उपस्थित होते


Recent Comments