Belagavi

भाजप उमेदवार रवी पाटील याना मतदारांचा उत्स्फूर्त पाठिंबा

Share

बेळगाव उत्तर मतदार संघाचे भाजपचे उमेदवार डॉ . रवी पाटील याना मतदारसंघातील जनतेचा भरघोस पाठिंबा लाभत आहे . भाजपचे कार्यक्रम जनप्रिय असून सर्वानी भाजपाला पाठिंबा देऊन मतदान करावे असे आवाहन खुद्द मतदार करीत आहेत .

बेळगाव उत्तर मतदार संघाचे भाजपचे उमेदवार , डॉ . रवी पाटील यांचा प्रचार जोरदार सुरु आहे . मतदारसंघातील रुक्मिणीनगर , रामतीर्थनगर ,चन्नम्मा सोसायटी , वंटमुरी कॉलनी , आदी भागात प्रचार करण्यात आला . यावेळी उमेदवार रवी पाटील यांनी घरोघरी भेट देऊन , मतयाचना केली .


या प्रचारात सहभागी झालेले प्रभाग क्रमांक ३६ चे नगरसेवक राजशेखर डोणी यांनी डॉ . रवी पाटील याना जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असून , १०१% भाजप जिंकणार असा विश्वास त्यानी व्यक्त केला . त्याचप्रमाणे सायकांळी होणाऱ्या अभिनेता सुदीप यांच्या रोड शोमुळे , भाजपाची मते नक्की वाढतील. असे ते म्हणाले .

तर प्रचारात सहभागी झालेल्या प्रभाग क्रमांक ३५ च्या नगरसेविका लक्ष्मी महादेव राठोड यांनी , डॉ . रवी पाटील याना मतदारांकडून चांगला प्रतिसाद लाभत असल्याचे सांगितले . १५ ते २० हजार मतांच्या फरकारने ते निवडून येतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला .


तर या भागातील रहिवासी असलेले शिवरुद्राप्पा शिलवंत या जेष्ठ नागरिकानी सांगितले कि , भाजपने जे काही जनतेच्या विकासाच्या दृष्टिने जाहीर केले आहे , आणि जनतेच्या ज्या काही अपेक्षा आहेत त्या पूर्ण करायला हव्यात . डॉ . रवी पाटील हे तरुण आणि उत्साही उमेदवार आहेत . ते कामे करतील असा संपूर्ण विश्वास आहे . सध्या आमच्या देशाला आणि राज्याला भाजपाची आवश्यकता आहे . त्यांचे विकास कार्यक्रम चांगले आहेत त्यामुळे जनतेने भाजपाला पाठिंबा देऊन , डॉ . रवी पाटील याना निवडून द्यावे असे मत व्यक्त केले .

निवडणुकीची तारीख जवळ येत चालली असल्याने , प्रचाराचा धडाका देखील वाढत आहे. बेळगाव उत्तरचे भाजपचे उमेदवार डॉ . रवी पाटील आपल्या सार्थक आणि भाजप कार्यकर्त्यांसह , मतदारांच्या घरोघरी जाऊन मतयाचना करीत आहेत . त्यांना जनतेचा उत्स्फूर्त पाठिंबा लाभत आहे .

Tags: