Belagavi

आसिफ सेठ यांनी शिवबसव नगर चा विकास करण्याचे दिले आश्वासन

Share

बेळगाव उत्तर मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार आसिफ (राजू) सेठ यांनी शिवबसव नगरच्या सर्व लोकांना आमंत्रित करून बैठक घेतली . या बैठकीत त्यांनी , जनतेच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडवण्याचे ठोस आश्वासन दिले .

बेळगाव उत्तरचे काँग्रेसचे उमेदवार आसिफ सेठ याना सर्व थरातून उत्तम पाठिंबा लाभत आहे . प्रचाराचा एक भाग म्हणून त्यांनी शिवबसव नगर भागातील रहिवाशांची बैठक घेऊन , समस्या जाणून घेतल्या . शिवबसव नगर हे सर्वाधिक वैद्यकीय विद्यार्थी, महाविद्यालये आणि डॉक्टर असलेला परिसर आहे .

या परिसराचा विकास करण्याचे आश्वासन दिले. यावेळी त्यांनी शिवबसव नगर येथील लोकप्रतिनिधींच्या तक्रारी ऐकून घेतल्या व जनतेची सेवा करण्याचे आश्वासन दिले, माजी आमदार फिरोज सेठ यांनी देखील , काँग्रेसचे उमेदवार आसिफ सेठ याना मतदान करून , काँग्रेसला निवडून आणण्याचे आवाहन केले .

यावेळी त्यांनी आसिफ सेठ यांच्या समाजकार्याची तसेच काँग्रेस सत्तेत आल्यानंतर राबवण्यात येणाऱ्या योजनांची माहिती दिली .
यावेळी शिवबसव नगर रहिवासी, प्रतिनिधी बैठकीला उपस्थित होते

Tags: