काल रात्री झालेल्या जोरदार पाऊस आणि वाऱ्यामुळे केळीची झाडे जमीनदोस्त झाल्याची घटना विजापूर जिल्ह्यातील मुद्देबिहाळ तालुक्यातील नालतवाड शहरात घडली.
रेवणसिद्धप्पा केंबवी यांच्या 1 एकर केळी बागेतील 1500 रोपांपैकी 700 झाडे पावसामुळे आणि वाऱ्यामुळे उन्मळून पडली आहेत . केळी उत्पादकांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरवल्याची स्थिती निर्माण झाली आहे. त्यासाठी सरकारने योग्य ती भरपाई द्यावी, अशी विनंती त्यांनी केली.

दुसरीकडे शहरातील पेट्रोल स्टेशनच्या मागे असलेल्या केळीच्या बागेत , सिद्धण्णा मनमंथन यांच्या शेतातील , एक एकरातील केळीचे पीक घेतले असून, त्यातील 300 झाडे जमीनदोस्त झाली आहेत.


Recent Comments