Belagavi

टिळकवाडी कन्नड महिला संघाचा ४४ वा वर्धापन दिन उत्साहात

Share

महिलांनी आपल्या घराची काळजी घेण्याबरोबरच स्वतःच्या आरोग्याची काळजी देखील घ्यावी असे डॉ . स्नेहल सुखटणकर यांनी सांगितले . .

टिळकवाडी कन्नड महिला संघाच्या ४४ व्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात त्या प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या . यावेळी डॉ. स्नेहल सुखटणकर यांनी महिलांना उत्तम आरोग्याच्या टिप्स दिल्या . वाढत्या वयानुसार , महिलांनी आपल्या आरोग्याची काळजी अधिक घ्यायला हवी . आपल्या घराची काळजी करतानाच आपली काळजी देखील घ्या . वेळच्या वेळी सर्व आरोग्य चाचण्या करा . नियमित व्यायाम , प्राणायाम , ध्यानधारणा करा . आपल्या मैत्रिणींसोबत छान वेळ घालावा असे सांगून सर्वाना वर्धापनदिनाच्या शुभेच्छा दिल्या .


यावेळी संस्थापक अध्यक्षा अध्यक्षा शुभदा कोटूलकर यांनी आपल्या संघाची आणि आतापर्यंतच्या संघाच्या वाटचालीची माहिती दिली .आमचा संघ १९७९ मध्ये सुरू झाला, तेव्हापासून आजतागायत रंजना नायक संघ अतिशय चांगल्या पद्धतीने चालवत आहेत, त्या संघाच्या आधारस्तंभ आहेत असे सांगितले .

वार्षिक अहवालाचे वाचन शुभा कडगद यांनी केले. संस्थापक अध्यक्षा रंजना नायक यांनीही यावरी आपले मनोगत व्यक्त केले .
त्यानंतर संघाद्वारे , घेतलेल्या स्पर्धाच्या बक्षीस वितरण समारंभ पाहुण्याच्या हस्ते पार पडला . यावेळी टिळकवाडी कन्नड संघाच्या सर्व सदस्या उपस्थित होत्या .

Tags: