बेळगाव उत्तर मतदार संघातील काँग्रेस उमेदवार आसिफ उर्फ राजू सेठ यांनी मूत्यानट्टी परिसरात प्रचार केला. यावेळी मतदारांनी त्यांचा सत्कार करून भरभरून स्वागत केले.
राष्ट्रीय काँग्रेसच्या उमेदवारीवर बेळगाव उत्तर मतदारसंघाच्या निवडणूक रिंगणात उतरलेले ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आसिफ उर्फ राजू सेठ यांनी जोरदार प्रचारमोहीम हाती घेतली आहे.

मतदारसंघातील मूत्यानट्टीसह परिसरात त्यांनी झंझावाती प्रचार केला. यावेळी मतदारांनी त्यांचा शाल व पुष्पहार घालून सत्कार करून शुभेच्छा दिल्या.
यावेळी राजू सेठ यांनी, निवडून आल्यास बेळगाव शहराच्या सर्व समस्या सोडवून सर्वांगीण विकास करण्याचे आपले ध्येय आहे, त्यासाठी काँग्रेसला भरघोस मतांनी निवडून देण्याचे आवाहन मतदारांना केले. यावेळी विविध जाती-धर्माचे, भाषिक नागरिक उपस्थित होते.


Recent Comments