Belagavi

काळी आंबराई भागात राजू सेठ यांना समर्थन व्यक्त

Share

बेळगाव उत्तर मतदारसंघातील काँग्रेसचे अधिकृत उमेदवार राजू सेठ यांनी रविवारी सकाळी प्रचारमोहीम राबवली. यावेळी मतदारांनी त्यांचे स्वागत करून समर्थन व्यक्त केले.

काळी आंबराई भागात प्रचार करणाऱ्या आसिफ उर्फ राजू सेठ यांचे स्थानिक रहिवाशांनी जोरदार स्वागत केले. त्यानंतर आसिफ राजू सेठ यांनी जनतेशी संवाद साधला आणि 10 मे रोजी मतदानाच्या दिवशी त्यांना, काँग्रेसला मतदान करण्याची विनंती केली. त्यानंतर त्यांनी काँग्रेसच्या जाहीरनाम्यात दिलेल्या गॅरंटी कार्डविषयी मतदारांना माहिती दिली.

काँग्रेसची सत्ता येताच काँग्रेसने आश्वासन दिलेले प्रकल्प कार्यान्वित केले जातील, असे सांगून ते म्हणाले की, गॅस सिलिंडर, दैनंदिन वापराच्या वस्तूंच्या वाढलेल्या किंमती कमी करू आणि बंद झालेले इंदिरा कॅन्टीन पुन्हा सुरू करू. काँग्रेसला मतदान केल्यास पुढील ५ वर्षात जनतेचे प्रश्न प्राधान्याने सोडवण्यात येतील असे राजू सेठ यांनी सांगितलं. यावेळी माजी नगरसेवक सतीश देवरपाटील यांच्यासह स्थानिक नागरिक उपस्थित होते.

Tags: