Belagavi

फिरोज सेठ, राजू सेठ यांचा अशोकनगर भागात प्रचार

Share

बेळगाव उत्तर मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार आसिफ उर्फ राजू सेठ यांनी त्यांचे बंधू माजी आमदार फिरोज सेठ यांच्यासोबत शनिवारी सायंकाळी अशोकनगर येथे रहिवाशांना भेटून प्रचार केला.

हा कार्यक्रम समुदायातील सदस्यांना उमेदवाराबद्दल अधिक जाणून घेण्याची, प्रश्न विचारण्याची आणि त्यांच्या समुदायाला भेडसावणाऱ्या समस्यांबद्दल चर्चा करण्याची संधी होती. यावेळी रहिवाशांनी उभयतांचे जल्लोषात स्वागत केले.

काँग्रेस पक्षाने समोर आणलेल्या नवीन चेहऱ्याला भेटण्यासाठी तरुण खूप उत्सुक होते.

मागील सरकारने प्रभागातील परिसर व विकासाकडे दुर्लक्ष केल्याने राजू सेठ यांना मतदान केल्यास त्यांच्या गरजा पूर्ण केल्या जातील व त्यांच्या तक्रारी सोडविल्या जातील, असे आश्वासन रहिवाशांना देण्यात आले. फिरोज सेठ यांच्या काळात बांधलेले जिम आणि इनडोअर स्टेडियम आता ओसाड झाल्याचे दिसून आले.

Tags: