केएलई कंकणवाडी आयुर्वेद महाविद्यालयाचे प्राध्यापक व शरीरविज्ञान विभागप्रमुख डॉ. महांतेश रामण्णवर यांना त्यांच्या वैद्यकीय सेवेची दखल घेत , विश्वगुरू बसवण्णा यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात बागलकोट जिल्ह्यातील लोकापूर येथील वेन्कटापुर गल्लीतील समुदाय भवन येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात बसव भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
डॉ. ईश्वरानंद स्वामीजी, हारुगेरी शरण विचार वाहिनीचे अध्यक्ष आय.आर.मठपती , लोकापूर खाण उद्योजक एम.ए.विरक्तमठ , लक्ष्मण मुद्दापुर, नागेश बसरकोड, हणमंत बुडनी उपस्थित होते.


Recent Comments